‘पटेली’ समकालीन मराठीतील भाषिक, सांस्कृतिक, राजकीय व्यवहाराबाबत बरंच काही बोलू पाहत असली तरी हे काम यापूर्वीच आणि अधिक प्रभावीपणे झालेलं आहे!

‘एक पुरुष, दोन स्त्रिया’ ही मूलभूत संकल्पना आणि कादंबरीभर अस्तित्वात असणाऱ्या विखंडिततेच्या दृष्टीने ‘पटेली’ ही कादंबरी प्रणव सखदेव यांच्या ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ची (रोहन प्रकाशन) आठवण करून देणारी आहे. या दोन्ही कादंबऱ्यांमध्ये प्रादेशिक, जागतिक साहित्य, सिनेमांचे असलेले संदर्भ हा एक समान धागा आहे. विशेष बाब ही की, दोन्हीकडे या संकल्पनांचं अस्तित्व असताना त्यामधील दोषदेखील समप्रमाणात अस्तित्वात आहेत.......